Charan Symbol पूजा विधी आणि पद्धतीCharan Symbol

भावीकांनी पूजाविधीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, संपर्क क्र. ०२४२८-२३२१००, २३२०००, ७७४४९२०२२२

पूजा पद्धती
शक्‍तीपीठ श्री क्षेत्र मोहटादेवीगड येथे पूजा विधी पद्धतीखालील प्रमाणे आहेत.

Text Section Image
Slider Image 1
Slider Image 2
Slider Image 3
Slider Image 4
Slider Image 5
Slider Image 6
Avatar

महापूजा

श्री मोहटादेवीची षोडशोपचार पुजा करुन पुरुषसुक्‍त, पवमान, रुद्र, श्रीसुक्‍त, देवी अथर्वशीर्षमंत्रानेअभिषेक करतात. लघुरुद्र, लघु पवमान, अभिषेक होऊन महावस्‍त्र व महानैवद्य समर्पण केला जातो.

Avatar

श्री सप्‍तशती पाठ अनुष्‍ठान

विधी व संकल्‍पयुक्‍त नवचंडी, शतचंडी, अयुतचंडी सहस्‍त्रचंउी, लक्षचंडी महायज्ञ केला जातो.

Avatar

श्री सुक्‍त अनुष्‍ठान

विधीयुक्‍त १६, १६००, एक लक्ष अशा संख्‍येने पाठ करुन दशांश हवन केले जाते.

Avatar

योगीनी देव देवता विधिवत् पूजन

चौसष्‍ट योगीनी, दशमहाविद्या, अष्‍टभैरव या देवतांची संकल्‍प व विधी न्‍यास ध्‍यानपूर्वक पूजा करुन मूळमत्रांनी हवन केले जाते.

Avatar

जपानुष्‍ठान

नवार्णमंत्र, कार्योपयोगी मंत्र, विविध स्‍तोत्र, कवच इत्‍यादी मंत्राचे भक्‍तांचे इच्‍छेनुसार जपानुष्‍ठान विधिवत करतात.

Avatar

पूजा

भक्‍त आपल्या संकल्‍पानुसार मंदिराच्या पायऱ्या चढतात, मंदिराची प्रदक्षिणा करतात, पूजा करतात आणि भक्तिभावनेने दानपेटीत दान अर्पण करतात अथवा पावती करतात.