Charan Symbolशक्तीपीठ श्रीक्षेत्र मोहटादेवी गडCharan Symbol

श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्‍ट , मोहटे ता. पाथर्डी जिल्‍हा अहिल्यानगर फोन नं. ७७४४९२०२२२

रजि.नं A-६३५/१९६७ ( अहिल्यानगर )
शक्तीपीठ श्रीक्षेत्र मोहटादेवी गड

शक्तीपीठ श्रीक्षेत्र मोहटादेवी गड


नवसाला पावणारी श्री मोहटादेवी रेणुकामातेच्‍या दर्शनासाठी भक्‍तगणांची वाढती संख्‍या, पुरातन असलेल्यामंदीराचीअवस्‍था, भावीकांसाठी सर्वसुखसोयी इत्‍यादी बाबींचा विचार करुन पुरातन मंदीराचा जीर्णोद्धार होऊन नूतन श्रीयंत्राधार मंदीराची उभारणी करण्‍यात आली. श्री यंत्रातील वृत्‍तत्रयानुसार नुतन मंदीरामध्‍ये तीन दर्शन रांगेची रचना करण्‍यात आली आहे. तीन दर्शन रांगेमध्‍ये श्री महागणपती, श्री गुरुदत्‍तात्रेय, श्री रुख्मिणी पांडुरग, श्री उमामहेश्वर, श्रीगुरु भगवानबाबा, श्री गुरु वामनभाऊ महाराज, चौसष्‍ट योगिनी, दशमहाविदया, अष्‍टभैरव या देवदेवताची प्रतीष्‍ठा, सुवर्ण कलशारोहन आणीसभागृहामध्‍ये यंत्रराज श्रीयंत्र प्रतीष्‍ठा सहस्‍त्रचंडीमहायज्ञासह प्रतीष्‍ठयाग नवकुंडात्मकपद्धतीनेविधियुक्‍त करण्‍यात आली. असे सर्वानंदमय सर्व देवदेवता सह यंत्रराज श्रीयंत्र प्रतीष्ठित असे श्रीयंत्राधारीत श्री मोहटादेवीचे भारतातील एकमेव मंदीर आहे. म्‍हणुनच साधु संत महात्‍म्‍ये यांनी शक्‍तीपीठ श्रीक्षेत्र मोहटादेवीगड असे नामभिधान दिले आणि आज सुसंस्कारीत धार्मिक पर्यटन क्षेत्र म्‍हणून अभिनवतेने गडाची महती नावारुपास येऊ लागली आहे. ही श्री मोहटा देवीचीच लीला, महती आहे.